जळगाव : प्रतिनिधी
शिवाजी नगर परिसरातील हुडको येथील एका सज्जनगड मध्ये एका खोलीत नरेश आनंद सोनवणे (रा. दूध फेडरेशन) येथील रहिवासी आहे. या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे.
हा खून कशासाठी व कुणी केला हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही.
घटनास्थळी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक विजय ठाकूरवाड यांचे पथक दाखल झाले होते. यावेळी शहर पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणची सर्व माहिती घेऊन आरोपीला पकडण्यासाठी पथके पाठविली आहे
गेल्या 24 तासात दुसरा खून झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप हल्लेखोर फरार झाले असून घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक कुमार चिथा यांच्या सोबत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आपल्या सूत्रांकडून माहीती घेण्याचे काम सुरू केले आहे. नरेशच्या पश्चात वडील, पाहुणे, 3 बहिणी असा परिवार होता
