जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कोठारी नगरात २६ रोजी श्रद्धा महिला मंडळ कोठारी नगर जळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शहरातील सामाजिक कार्यांत नेहमी अग्रेसर असलेल्या श्रद्धा महिला मंडळाकडून नेहमी सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जात असतात. २६ रोजी महिला मंडळातर्फे कोठारी नगरात मंडळाच्या अध्यक्ष सौ नेहा संतोष जगताप यांच्याकडून प्रत्येक सदस्यांना कडुलिंब बदाम, शिष्यम, वळ, पिंपळ ,असे अनेक रोप भेट म्हणून देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सौ पूजा भंडारकर, सचिव सौ सुनिता बोरसे, सदस्य जयश्री शिंपी ,पुष्पा मेटकर, जिजाबाई बोरसे ,भाग्यश्री मांडगे पूजा सोनवणे ,सोनाली शिंपी, पूजा कापुरे आधी उपस्थित होत्या
