• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १  जुलै २०२५

पारोळा तालुक्यातील सुमठाणे येथील वनक्षेत्राच्या कुरण जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडलेल्या शोभाबाई रघुनाथ कोळी (वय ४८, रा. उंदिरखेडे, ता. पारोळा) यांच्या मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवली. त्यानंतर तपासचक्रे फिरवित महिलेचा खून करुन पसार होत असलेल्या अनिल गोविंदा संदांशिव (वय ४५, रा. उंदीरखेडे, ता. पारोळा) याच्या मुसक्या आवळल्या. त्याला खाक्या दाखविताच महिलेकडे असलेल्या सोन्यांच्या दागिन्यांसाठी आणि महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून त्याने खून केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वृत्त असे कि, वनक्षेत्राच्या राखीव कुरण जंगलाच्या मध्यभागी एका महिलेला छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजून गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ महिलेची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. त्याकरीता धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यातून वयस्कर महिला हरविली आहे का याची देखील तपासणी केली जात होती. याचवेळी पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे येथील शोभाबाई कोळी या हरविल्याची माहिती पारोळा पोलिसांना मिळाली.

छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेल्या महिलेचे फोटो पोलिसांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. दरम्यान, हरविलेल्या शोभाबाई कोळी यांचा फोटो आणि जंगलात आढळून आलेल्या मृतदेहामध्ये साम्य आढळल्याने त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करुन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत शोभाबाई कोळी या धूणीभांडी करुन सोन्याचे दागिने परिधान करीत होत्या. त्यामुळे गावातील अनिल संदांशिव याने महिलेसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करुन तीला सुमठाणे गावाजवळ असलेल्या वनक्षेत्राच्या जंगलात नेले. याठिकाणी महिलेचे हातपाय बांधून तिच्या चेहऱ्यावर दगड टाकून खून केल्याची संशयिताने कबुली दिली. तसेच हा खूनाला अनैतिक संबंधाची देखील किनार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group