मुंबईः ज्या प्रकारे आपण लहान मुलांना आपलेपणा देत असता त्याचा परिणाम लहान मुलांवर पडत असतो. काही पालक लहान मुलांवर एवढं रागवतात की, त्यांच्या वयाचे भान न ठेवता त्यांना मारपीठपण करतात. लहान मुलांवर हा केलेला हिंसात्मक प्रकार त्यांच्या मानसिक आरोग्यावर पडत असतो. त्यामुळे त्यांच्या मनावर आई वडिलांविषयी नकारात्मकतेच्या भावना निर्माण होत असतात. त्यांना जर मारपीठ झाली तर त्यांच्या मनात नंतर आपसुकच आई वडिलांविषयी नाराजीचे सूर दिसून येतात. मारपीठ केल्यामुळे नकारात्मकता मनात येऊन परिस्थिती आणखी बिकट होते. तुमच्या मुलांसाठी तुम्ही कडक नीतिनियम आखत असालही पण त्यासाठी तुम्ही लहान मुलांवर हात उचलणे, त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे.
मुलांना जर तुम्ही मारहाण करत असाल तर नकारात्मकतेच्या अनेक गोष्टी समोर येतात. मुलांवर नेहमीच हिंसात्मक घटना घडत असतील, त्यांना नेहमीच मारहाण होत असेल तर त्याचा राग लहान मुलं दुसऱ्या ठिकाणी काढू शकतात. त्यामुळे लहान मुलांचे समवयस्क असू शकतात, त्यांना ते मारहाण करु शकतात, त्याचा वाईट परिणाम म्हणजे इतर लहान मुलांना ती जखमीही करु शकतात.
बालकांच्या शालेय जीवनावर परिणाम
लहान मुलांना तुम्ही जर मारझोड करत असाल तर याकडे लक्ष द्या, कारण लहान मुलां मारहाण झाली तर मुलं मानसिक आणि शारीरिकरित्या ती असुरक्षित होतात. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. हा परिणाम झाला तर आपसुकच त्यांना त्यांच्या शालेय जीवनातही अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कौटुबीक हिंसाचाराचा परिणाम बालकांच्या शालेय जीवनावर होतो.
आत्मविश्वासाला तडे
मुलांना तुम्ही जर शिस्तबद्धतेने ठेऊ पाहात असाल आणि त्यासाठी मारहाण होत असेल तर लहान मुलांच्या आत्मविश्वासाला तडे जाऊ शकतात. मुलांना केलेल्या मारहाणीचा इतका वाईट परिणाम पडू शकतो की, त्यांचा आत्मविश्वास त्यात गमावला जाऊ शकतो, त्यामुळे ते जर कोणती गोष्ट सांगू पाहत असतील तर ते पूर्ण विश्वासाने नाही सांगू शकत. कौटुंबीक मारहाणीचा परिणाम त्याच्या शालेय जीवनावर होऊन त्याचा त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होऊ शकतो. काही गोष्टी शिकताना त्याला अडचणी जाणवू लागता, आणि मग शाळेत अशा अभ्यास न करणाऱ्या मुलांमुध्ये अशांना गणले जाऊ शकते.
पालकांविषयी प्रचंड नकारात्मकता
लहान मुलांना मारहाण करणाऱ्या पालकांविषयी त्यांच्या मनात पालकांविषयी प्रचंड नकारात्मकतेची भावना निर्माण होते. त्यामुळे आपल्या पाल्यांना मारहाण करणाऱ्या पालकांविषयी मुलांच्या मनात कोणतीही किंमत ठेवली जात नाही. त्यांच्या मनात पालकांविषयी तिरस्काराची भावना उत्पन्न होते. सततच्या मारहाणीमुळे मुले पालकांपासून दूर दूर जातात. कधी जर त्याच्या नजरेत दुसऱ्याच मुलाला त्याचे पालक मारहाण करत असतील तर त्यालाही रडू कोसळते. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या आयुष्यात जितके त्यांना प्रेम देता येईल तितके ते दिले पाहिजे, आणि त्यांच्या आयुष्यासाठी तेच गरजेचेच असते.
