भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील साकरी येधील शिवम नगर भागात रात्री चोरट्याने बंद घराचे मेन गेटचे व दरवाज्याचे कुलूप तोडून घरात अनधिकृत प्रवेश करून घरफोडी करून ६ लाख ८२ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड घेऊन अज्ञात चोरटा पसार झाल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी गणेश तुकाराम साबरे वय ४८ राहणार आर. बी. १ – १२३८/जी कंडारी रोड भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ७ रोजी रात्री १२.३० वाजता ते ८ रोजी सकाळी ०६.०० वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांचे मोठे भाऊ मधुकर तुकाराम साबरे यांचे साकरी गावातील शिवम नगर येथील बंद घराचे मेन गेटचे व दरवाज्याचे कुलूप चोरट्याने तोडून घरात अनधिकृत प्रवेश करून घरफोडी करून घरातील बेडरूम मधील लाकडी फर्निचर मध्ये ठरलेले लोखंडी पत्री पेटीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ६,८२,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल लबाडीच्या इराद्याने घरफोडी करून चोरून नेला म्हणून तालुका पोलीस स्टेशनला पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या आदेशावरून गुरुन ४७/२०२२ भा.द.वि कलम ४५४,४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अमोल रामचंद्र पवार करीत आहे.