जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी स्वाक्षरी मोहीमेचा आज जिल्हा मुख्यालयासमोर सुरुवात झाली
यावेळी राज्याचे सामाजिक मंत्री ना. धनंजय मुंडे व जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.
राज्यात सध्या भोंग्यांचा विषय चांगलाच गाजत आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस मुख्यालयासमोर जळगाव जिल्ह्यात सर्व समाजात एकता व सलोख्याचे वातावरण निर्मीतीसाठी संदेश देण्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली आहे. ही स्वाक्षरी मोहिम शनिवार ७ मे रोजी रात्री ९ वाजेपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमांस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त डॉ. गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री मुंडे यांनी उपस्थित ना. गुलाबराव पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, मुफ्ती हारून नदवी, रवींद्र पाटील, अशोक लाडवंजारी यांचे हातात हात घेऊन सर्व धर्मीय एकतेचा संदेश यावेळी दिला.यावेळी पोलीस अधीक्षकांचे परिवारसुद्धा स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच या स्वाक्षरी मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे.