जळगाव : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव पॉवर@२०४७ साजरा करण्यासाठी आयोजित ऊर्जा महोत्सवाचा भडगाव येथे शुभारंभ करण्यात आला.
या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत (भा.प्र.से.)तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्री पंकज आशिया ,महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री कैलासजी हुमणे, जळगाव महावितरण मंडळाचे अधीक्षक अभियंता फारुख शेख, पॉवर फ़ाइनैन्स कॉर्पोरेशन चे श्री दुर्गेश रंगारी , भडगाव तहसीलदार श्री हिवाळे ,भडगावचे बी डी ओ श्री वाघ प्रामुख्याने उपस्थित होते.
ऊर्जा ही समाजाचा अविभाज्य घटक असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवुन यंत्रणा अधिक मज़बूत करावी , असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या प्रसंगी केले.
तर देशाच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महावितरणचे वीज बिल नियमित भरणे ही एक प्रकारची देशसेवाच आहे,त्यामुळे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याची विनंती जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री कैलास हुमणे यांनी केली. तसेच विविध योजनांची माहिती देत अभय योजनेअंतर्गत कायमस्वरूपी खंडित ग्राहकांना नियमित वीज जोडणी घेण्याचे आवाहन केले.
केंद्र सरकारच्या विविध योजना व योजनांची माहिती ही समर्थ कला बहुद्देशीय संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून दिली त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून लोकगीत व लोक नृत्याचा कार्यक्रम करण्यात आला यात विशाल जाधव ,संकेत राऊत ,युगंधरा राऊत , मयूर बंगाळे सागर सदावर्ते अक्षय पाटील, किशोर मराठे , प्रणिता शिंपी, भावेश पाटील ,रवी कुमार परदेशी, यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभि पराग चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन अभि. राहुल निकम यांनी केले ,या कार्यक्रमास यशस्वीतेसाठी कार्यकारी अभि विशाल खंडारे , उपकार्यकरी अभि योगेश पाटील, अभि रवींद्र राऊळ यांनी मेहनत घेतली
