पारोळा : प्रतिनिधी
येथील कै.दगडू नारायण भोई प्रतिष्ठान बहादरपुर व रा.का.मिश्र विद्या मंदिर बहादरपुर येथिल माझी.प्राचार्य कै.डी.एन.भोई सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रा.श्री.सुनील दगडू मोरे यांनी आर.ओ.सिस्टीमचे वॉटर फिल्टर पाण्याच्या टाकी सह शाळेला भेट दिले.त्यामुळे आमच्या शाळेतील अदिवासी मुलांना चांगल्या प्रतीचे आरोग्यदायी पाणी मिळेल त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील सदरच्या आर.ओ.सिस्टीम च्या पाण्यामुळे आदिवासी मुलांचा फार मोठा फायदा झाला तसेच पुढील शैक्षणिक वर्षात आमची शाळा 100% डिजिटल करून देण्याचा व शाळेला दत्तक घेण्याच्या त्यांचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला .
सदर कार्यक्रमास जय हिंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धुळे पर्यवेक्षक प्रा. सुनील दगडू मोरे,
बेंडाळे कॉलेज प्रा.जितेंद्र दगडू मोरे, सीनियर कॉलेज तळोदा प्रा.डॉ.राजेंद्र दगडू मोरे,
निवृत्त शिक्षक वसंतराव फकीरा सोनवणे, रा.का मिश्रा विद्यामंदिर प्रा.मधुकर पंडित शिवदे, बहादरपुर व सर्व परिवार उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.दगडू गोरख पाटील व उपशिक्षक ईश्वर रामदास धोबी यांनी परिश्रम घेतले.