जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजीनगर परिसरातील हुडको येथे दुपारी २ ते ३ वा. २८ वर्षीय तरुणाचा घरात घुसून निर्घुण खून झाला होता. या घटनेची माहिती समजताच शहर पोलिसांनी धाव घेत पुढील कार्यवाहीला सुरुवात केली. अवघ्या काही तासात एलसीबीच्या पथकाने महिलेसह एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जळगाव शहरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या नरेश आनंदा सोनवणे वय-२८ या तरुणाचा शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर हुडको परिसरात खून करण्यात आला. घरात घुसलेल्या काही तरुणांनी चॉपरने वार करून नरेशचा खून केला होता. घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे पथकासह पोहचले होते. एलसीबीच्या पथकाने अवघ्या काही तासात रेल्वे स्टेशन परिसरातून महिलेसह आकाश सखाराम सोनवणे या संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांची कामगिरी कौतकासपद
शहरात गेल्या २४ तासात २ खून झाले पहिला खून रात्रीच्या सुमारास समता नगर येथे झाला. या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले तर दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील हुडकोमध्ये झालेल्या खुनातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले आहे. या कामगिरीमुळे शहरातील नागरीकडून पोलिसानी केलेल्या कर्तबगार कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वातील जितेंद्र पाटील, विजयसिंह पाटील, अक्रम शेख, प्रीतम पाटील आदींच्या पथकाने संशयीत आरोपी आकाशला रेलवे स्टेशन परीसरातून ताब्यात घेतले तर महिलेलादेखील चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.