• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची लूट : जळगावमधून चौघे अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 18, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८  एप्रिल २०२६ 

मुंबईतील एका प्रौढ महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावून तब्बल ६५ लाख रुपये उकळल्याच्या गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात मुंबई सायबर क्राईम शाखेने मोठी कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील चौघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीचे वाढते जाळे पुन्हा एकदा समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव यांच्या पथकाने नशिराबाद येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयेश काळे (वय २६, रा. तरसोद, जि. जळगाव) याला प्रथम ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.  त्याच्या माहितीनुसार संकेत सोपान महाजन (वय २८) व यशवंत शालिक धांडे (वय २९), दोघेही रा. मेहरुण, जळगाव, यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. तसेच या रॅकेटमधील आणखी एक आरोपी विनोद प्रकाश अत्तरदे (वय ३८, रा. खेडी, जळगाव) यालाही अटक करण्यात आली.

तपासात समोर आले की, आरोपींनी मुख्य सूत्रधाराच्या सांगण्यावरून मुंबईतील फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन सुमारे २५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले होते. ही रक्कम जळगाव येथे आणून पुढील व्यवहारासाठी वापरण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली असून, मुख्य आरोपी जयेश काळे याच्याकडून दीड लाख रुपये रोख व अंदाजे पाच तोळे सोनेही जप्त करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम इतर मार्गाने विल्हेवाट लावल्याचेही उघड झाले आहे.

प्राथमिक तपासात जयेश काळे हा यापूर्वी कंबोडिया येथे नोकरी करत असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीशीही संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपींनी ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून संबंधित महिलेला घाबरवून मोठी रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटक आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईतील सायबर पोलीस ठाणे (पश्चिम विभाग, बांद्रा) येथे नेण्यात आले असून अधिक तपास पूनम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची साखळी, संपर्क व डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.

दरम्यान, ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या सायबर फसवणुकीच्या घटना आता ग्रामीण भागातही पोहोचत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. खानदेशातील जळगावपर्यंत या गुन्ह्याचे जाळे पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी अनोळखी कॉल, धमक्या किंवा ऑनलाईन व्यवहारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !
क्राईम

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026
भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !
क्राईम

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !

April 18, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जळगाव

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !
जळगाव ग्रामीण

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

April 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची लूट : जळगावमधून चौघे अटकेत !

April 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group