• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home वाणिज्य

10 हजार रुपयांची थकबाकी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2022
in वाणिज्य
0
10 हजार रुपयांची थकबाकी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – 2022’ अभय योजना आज विधीमंडळात जाहीर केली. कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. यासंदर्भातील विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज मंजूर करण्यात आले. सदर योजनेसंदर्भात माहिती देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, वस्तू व सेवा कर अस्तित्वात येण्यापूर्वी विक्रीकर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध करांसंदर्भातील ही योजना असून या योजनेंतर्गत आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या घोषणेचा लाभ छोट्या व्यापाऱ्यांना सुमारे 1 लाख प्रकरणांमध्ये होणार आहे.
80 टक्के रक्कम माफ होणार
ज्या व्यापाऱ्यांची वैधानिक आदेशान्वये थकबाकीची रक्कम 1 एप्रिल 2022 रोजी, 10 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यापाऱ्यांना अविवादीत कर, विवादीत कर, शास्ती या वेगवेगळा हिशोब न करता सरसकट एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. अशी ठोक 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरीत 80 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. राज्यातील लहान व्यापाऱ्यांना जवळपास 2 लाख 20 हजार प्रकरणांमध्ये याचा लाभ होणार आहे.
5 टक्के भरणा करावा लागेल
जे व्यापारी अशा प्रकारे ठोक रक्कम भरण्यास पात्र ठरणार नाहीत किंवा ते हा पर्याय निवडणार नाहीत, अशा व्यापाऱ्यांना थकबाकीच्या तडजोडीसाठी प्रस्तावित योजनेमध्ये अविवादीत करास कुठलीही सवलत देण्यात येणार नाही. अविवादीत कराचा 100 टक्के भरणा करावा लागेल. मात्र, विवादीत करापोटी 31 मार्च 2005 पूर्वीच्या कालावधीसाठी 30 टक्के भरणा करावा लागेल. त्याचबरोबर व्याजापोटी 10 टक्के व शास्तीपोटी 5 टक्के भरणा करावा लागेल. त्याचबरोबर 1 एप्रिल 2005 ते 30 जून 2017 या कालावधीसाठी विवादीत रकमेपोटी 50 टक्के, व्याजापोटी 15 टक्के, शास्तीपोटी 5 टक्के व विलंब शुल्कापोटी 5 टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर उर्वरीत थकबाकी माफ करण्यात येणार आहे.
व्यापाऱ्याला प्रमाणशीर लाभ
अभय योजनेच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक रकमेचा एकरकमी भरणा विहित कालावधीत करावा लागेल. तथापि, ज्या व्यापाऱ्यांची एका आर्थिक वर्षाची थकबाकी 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यापाऱ्यांना अभय योजनेंतर्गत भरावयाच्या आवश्यक रकमेसाठी हप्ते सवलतीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एकूण हप्ते सवलत 4 भागात विभागली असून पहिला हप्ता 25 टक्के हा 30 सप्टेंबर 2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे. उरलेले 3 हप्ते पुढच्या 9 महिन्यात भरावे लागणार आहेत. आवश्यक रकमेपेक्षा कमी भरणा केल्यास त्या व्यापाऱ्याला प्रमाणशीर लाभ देण्यात येईल. सदर अभय योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं आणि पारदर्शकपणे राबवण्यात येणार असून कोरोना संकटानं अडचणीत आलेल्या उद्योग व व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यात, उभारी देण्यात ही योजना महत्वाची भूमिका बजावेल, तसंच योजनेला उद्योग व व्यापार क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Related Posts

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !
राजकीय

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ
जळगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील
जळगाव

महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

January 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!

जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!

March 18, 2026
भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

March 18, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

March 18, 2026
इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

March 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group