नवी दिल्लीः वृत्तसंस्था
Maruti Suzuki WagonR ने पुन्हा एकदा जबरदस्त पुनरागमन करीत आपली पकड कायम केली आहे. ही गेल्या महिन्यात बेस्ट सेलिंग कार ठरली आहे. ज्याला २४ हजार हून जास्त ग्राहकांनी खरेदी केले आहे. खरं म्हणजे Maruti Suzuki Swift ने फेब्रुवारी महिन्यात मोठी उलथापालथ करीत सर्वात जास्त विकणाऱ्या कारचा खिताब आपल्या नावावर केला होता. परंतु, मार्च महिन्यात मारुती वेगनआरने शानदार पुनरागमन केले आहे. मारुती सुझुकी वेगनआरने मार्च महिन्यात Maruti Suzuki Alto (मारुती सुझुकी ऑल्टो), Hyundai Creta (ह्यूंदाई क्रेटा), Tata Nexon (टाटा नेक्सॉन), Maruti Baleno (मारुती नेक्सा बलेनो), Hyundai Venue (ह्यूंदाई वेन्यू), Tata Punch (टाटा पंच) आणि Kia Seltos (किया सेल्टॉस) सारखी बेस्ट सेलिंग कारला मागे टाकत बेस्ट सेलिंग कारचा खिताब आपल्या नावावर केला आहे.
गेल्या महिन्यात किती लोकांनी खेरदी केली
Maruti Suzuki च्या WagonR गेल्या महिन्यात (मार्च २०२२) २४ हजार ६३४ ग्राहकांनी खरेदी केली. मार्च महिन्यात याच्या विक्रीत ३१ टक्के वाढ झाली आहे. मार्च २०२१ मध्ये याला १८ हजार ७५७ ग्राहकांनी खरेदी केले होते. मारुतीने नुकतेच वेगनआरचे नवीन मॉडल लाँच केले आहे. याची सुरुवातीची दिल्ली एक्स शोरूम किंमत ५.४० लाख रुपये आहे. जी याच्या टॉप एन्ड व्हेरिंयटची किंमत ६.९८ लाख रुपयांपर्यंत जाते. तर जुन्या वेगनआरची सुरुवातीची दिल्ली एक्स शोरूम किंमत ५.१८ लाख रुपये आहे. तर ही किंमत ६.५८ लाख रुपयांपर्यंत जाते. नवीन वेगनआरच्या पेट्रोल मॉडल मध्ये १६ टक्के आणि सीएनजी मॉडलमध्ये ५ टक्के मायलेज वाढवले आहे. याच्या पेट्रोल मध्ये २५.१९ किमी प्रति लीटर आणि सीएनजी व्हेरियंट मध्ये ३४.५ किमी प्रति किलोग्रॅमपर्यंत मायलेज मिळते.
नंबर वनवरून थेट नंबर ५ वर पोहोचली स्विफ्ट
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात Maruti Suzuki Swift बेस्ट सेलिंग होती. ज्याला १९ हजार २०२ ग्राहकांनी खरेदी केले होते. परंतु, मार्च महिन्यात हे पहिले स्थान गमवावे लागले. ही कार थेट पाचव्या स्थानावर पोहोचली. मार्च २०२२ मध्ये मारुती सुझुकीची स्विफ्टला १३ हजार ६२३ ग्राहकांनी खरेदी केले.
टॉप ५ मध्ये या कारला मिळाले स्थान
Maruti Suzuki Dzire गेल्या महिन्यात देशात दुसरी सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली आहे. ज्याला १८ हजार ६२३ ग्राहकांनी खरेदी केली. तर मारुती सुझुकी डिझायर नंतर मारुतीची बलेनो विक्रीत तिसऱ्या नंबरवर आहे. मारुती सुझुकी बलेनोला गेल्या महिन्यात १४ हजार ५२० ग्राहकांनी खरेदी केले. या दरम्यान टाटा नेक्सॉन चौथ्या आणि मारुती स्विफ्ट पाचव्या नंबरवर आहे. टाटा नेक्सॉनला गेल्या महिन्यात १४ हजार ३१५ ग्राहकांनी खरेदी केले होते.
टॉप १० मध्ये यांना मिळाले स्थान
मारुती सुझुकी विटारा ब्रेझा विक्रीत सहाव्या, ह्युंदाई क्रेटा सातव्या, टाटा आठव्या, ह्युंदाई १० ग्रँड नवव्या आणि मारुती ईको दहाव्या नंबर वर आहे. या दरम्यान किआ सेस्टॉस, मारुती सुझुकी अर्टिगा आणि ह्युंदाई वेन्यू सारख्या कारला टॉप १० मध्ये स्थान मिळाले नाही.