अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावात नदीकाठी उदरनिर्वाहासाठी शेतात राहत असलेल्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलगी १ जानेवारी रोजी तिच्या आईसोबत बकऱ्या चारण्यास गेली होती. दुपारी १२ वाजता डोके दुखत असल्याचे सांगून ती घराकडे निघाली. मात्र सायंकाळी तिचे वडील घरी आले असता ती दिसली नाही. परिसरात क नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने अज्ञाता इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची खात्री तिच्या कुटुंबीयांना झाल्याने मारवड पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे.