जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू असुन राज्यभरात या निवडणूकांमुळे वातावरण चांगलेच तापले असतांना आज दि.५ रोजी सायंकाळी जळगावात अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले. त्यांनी विमानतळावरून थेट फोर सिझन हॉटेल गाठले. त्या ठीकाणी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी २० मिनीटे गुप्तगु केली. त्यानंतर धुळे येथे कारने रवाना झाले.
दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कुठली ही वाच्यता नसतांना अचानक मुख्यमंत्री दौऱ्यावर आले आणि मंत्री महाजनांशी गुप्तगु केल्याने चर्चाना उधान आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धुळे येथे लग्नसमारंभाला जाणार असल्याने त्यांचे विषेश विमानाने जळगाव येथील विमानतळावर आगमण झाले. तेथुन मंत्री गिरीष महाजन व त्यांचे एमआयडीसी भागातील फोर सीझन हॉटेल मध्ये आगमण झाले. हॉटेल मध्ये साधारणतः २० मिनीटे राजकीय घडामोडींवर चर्चा झाली.