जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२३
पाचोरा शहरातील येथील पुनगाव रोड भागात राहणाऱ्या तरुणीचा डेंग्यूची लागण झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी रात्री घडली. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील खासगी रुग्णालयात चेतना शांताराम पाटील (वय २२) चार दिवसांपूर्वी ताप असल्याने दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि. १४ रोजी रात्री उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. तावरे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शांताराम पाटील यांची ती कन्या असून चिंचखेडा (ता. पाचोरा) या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले