जळगाव मिरर | २५ नोव्हेबर २०२३
अमरावती श्री शिवाजी शिक्षण संस्था , महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन व अमरावती जिल्हा खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने दि. २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या २ री महाराष्ट्र राज्य खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेस अमरावती येथे उत्साहात सुरवात झाली.
या स्पर्धेचे उदघाटन खासदार सौ नवनीत राणा यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबूजी इंगोले, आमदार बळवंत वानखेडे, मा.महापौर विलास इंगोले, महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशनचे सचिव अमन चौधरी, पदाधिकारी सुनिल हामंद, गुरुपालसिंग सेठी, राजेश जाधव, प्रशांत कोल्हे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नितीन चवाळे यांनी केले. स्पर्धेत जळगाव जिल्हा ॲथेलेटीक्स असोसीएशनच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली.
30+ 400 मी.धावणे प्रथम-अनिल मोरे, 100 मी. धावणे तृतीय-अमोल सपकाळे,
35+ थाळी फेक प्रथम- इरफान पठाण, भालाफेक थाळीफेक तृतीय-मयूर पाटील, 100 मी. धावणे तृतीय- गिरीश चोपडे,
35+पुरुष गट 4×100 रीले प्रथम
अनिल पठाडे, गिरीश चोपडे, दीपक नेहेते, गोरख बारी
35+महिला 400 मीटर धावणे प्रथम व लांब उडी तृतीय- अनिता पाटील
40+ 100 मी.धावणे प्रथम- अनिल पठाडे, उंच उडी द्वितीय व थाळी फेक तृतीय- दीपक नेहेते, लांब उडी तृतीय- योगेश सोनवणे, 110
मी. अडथळ्याची शर्यत प्रथम- गोरख बारी, 1500 मी.धावणे तृतीय- हरिभाऊ राऊत, भाला फेक तृतीय- प्रा.समीर घोडेस्वार
45+ 100 मी.धावणे द्वितीय भालाफेक द्वितीय, लांब उडी द्वितीय – पीएसआय भगवान कोळी, थाळी फेक द्वितीय व भालाफेक तृतीय – गिरीश महाजन,
50+ भालाफेक तृतीय-प्रशांत कोल्हे,
55+ महिला 1500 मी.धावणे प्रथम-छाया तायडे,
60+ लांब उडी प्रथम व 100 मी. धावणे द्वितीय रवींद्र मोरे, 55+ 4×400 रिले तृतीय निलेश पाटील, सचिन सूर्यवंशी, रोहिदास महाले, दिपक नेहेते.