जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२४
पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २४ वर्षीय तरुण जखमी झाल्याची घटना घडली. तर दुचाकी रस्त्याखाली उलटल्याने दोन तरुण जखमी झाल्याची घटना मोरफळ गावाजवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवे येथील अक्षय लक्ष्मण पाटील (वय २४) असे अपघातातील जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी नरेंद्राचार्य महाराज संस्थाने धाव घेत जखमीस कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यावर डॉ. प्रशांत रनाळे, परिचारिका नीशा पाडवी, राजू वानखेडे आदींनी उपचार केलेत पारोळा तालुक्यातील मोरफळ गावाजवळ २१ रोजी रात्री ७.३० वाजता दुचाकीस्वारास रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी रस्त्याखाली जाऊन उलटली. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानची विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घेऊन चालक आशुतोष शेलार हे घटनास्थळी पोहोचले. अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील नीलेश पाटील (वय ३०) व विकास पाटील (वय ३०) या अपघातातील जखमी दोघा तरुणांना शेलार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे