जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक भागात अपघाताच्या घटना घडत असतांना खान्देशात देखील पावसाचा तडाखा सुरु असतांना या पावसात देवदर्शनावरुन परतताना चारचाकीचा झालेल्या भीषण अपघातात ४ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अक्कलकोटहून दर्शन घेऊन परतणारी गाडी थेट दरीत कोसळली. जळगावच्या चाळीसगावच्या कन्नड घाटात हा भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव येथील काहीजण अक्कलकोट दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना कन्नड घाटात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. दाट धुके आणि अंधार यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट दरीत कोसळून हा अपघात झाला. अपघातात गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीसह दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर सात जण जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या अपघातात मयत प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय वय ६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५), पूर्वा गणेश देशमुख (वय ८) यात जखमीची नावे अनुज सुर्यवंशी (वय २०), जयेश सुर्यवंशी (वय २०), सिधेस पवार, (वय १२), कृष्णा शिर्के (वय ४), रूपाली देशमुख (वय ३०), पुष्पा पवार (वय ३५), वाहन चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) हे जखमी झाले आहेत