जळगाव मिरर | २४ जुलै २०२३
देशातील गुजरातमधील जुनागडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. हि घटना सोमवारी काडियावल परिसरात एक इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली 4 जण अडकले आहेत. ही इमारत भाजी मंडईजवळ होती आणि खाली दुकाने होती. भाजी मंडईमुळे येथे मोठी गर्दी असते. अशा स्थितीत अनेक जण अडकण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली 12-15 लोक दबले गेल्याचे काही वृत्तांत सांगितले जात आहे. पोलिस आणि एसडीआरएफच्या पथकाने बचावकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत खूप जुनी होती. त्यात राहणाऱ्या लोकांना महापालिकेने नोटीसही दिली होती. शनिवारी शहरात आलेल्या पुरामुळे त्याचा पाया आणखीच कमकुवत झाला होता. त्यामुळे आज ही इमारत कोसळली. गुजरातमधील जुनागड शहरात शनिवारी 4 तासांत 10 इंच पाऊस झाला. यानंतर शहर जलमय झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही जुनागड पुराच्या पाण्यात बुडाला. अनेक भागांत शेकडो कच्च्या घरांची पडझड झाली. जे भाग पाण्यात बुडाले होते, तेथील लोकांचे सर्व सामान उद्ध्वस्त झाले आहे. पुराच्या तडाख्यात आलेल्या शेकडो जनावरांचे मृतदेहही सापडले आहेत.