• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६  एप्रिल २०२६ 

साकोली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्षाने गंभीर वळण घेतले असून, सलग घडणाऱ्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे सावट गडद झाले आहे. नरभक्षक वाघिणीच्या दहशतीत भर घालत बुधवारी (दि. १५ एप्रिल) पहाटे विर्शी परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

आशिका काशिनाथ मिरी (वय ५) असे मृत बालिकेचे नाव असून, ती छत्तीसगड राज्यातील बलोदा बाजार जिल्ह्यातील सुहेला गावची रहिवासी होती. कुटुंबासह ती विर्शी येथे वीटभट्टीवर कामासाठी आली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाविरोधात नागरिकांचा रोष तीव्र झाला आहे.

बुधवारी पहाटे सुमारे ५ वाजता कुटुंब झोपेत असताना शेतातील मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. काही कळण्याच्या आतच त्याने चिमुकलीला जबड्यात पकडून ओढून नेले आणि ठार केले. या भीषण घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

साकोली तालुक्यात यापूर्वीच एका नरभक्षक वाघिणीने दोन जणांचा बळी घेतला असून, आणखी एका महिलेला गंभीर जखमी केले आहे. १९ मार्च रोजी बांपेवाडा येथील वसंता मेश्राम यांच्यावर पहिला हल्ला झाला. त्यानंतर २८ मार्चला उमरझरी येथील माया सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १ एप्रिलला आमगाव येथील छाया मूंगमोडे या गंभीर जखमी झाल्या. या घटनांमुळे वाघिणीने नरभक्षक रूप धारण केल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सध्या वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढला आहे. टी-२७ या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाचे १७० हून अधिक कर्मचारी गेल्या २६ दिवसांपासून रात्रंदिवस जंगलात शोधमोहीम राबवत आहेत. मात्र ही वाघीण अद्याप हाती लागलेली नाही. त्यातच विर्शी येथे बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना ठरल्याने वनविभागासमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. एकीकडे नरभक्षक वाघिणीला जेरबंद करणे आणि दुसरीकडे बिबट्याचा बंदोबस्त करणे, हे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या सलग घटनांमुळे साकोली तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. शेतात काम करणे, घराबाहेर पडणेही धोकादायक झाले आहे. संतप्त नागरिकांनी वनविभागाने तात्काळ कठोर पावले उचलून संबंधित वन्यप्राण्यांना जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जीवाची पर्वा न करता जंगलाचा कानाकोपरा पिंजून काढत असून, लवकरच या हिंस्र प्राण्यांना पकडण्यात यश मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Related Posts

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026
प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !
जळगाव

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

May 11, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group