
जळगाव मिरर । २८ डिसेंबर २०२२
राज्यात गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुलीसोबत होणारे गुन्हे वाढत चालले आहे. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. जी पुणे शहराला हादरा देणारी ठरली आहे.
शहरातील एका परिसरातील एका पंधरा वर्षे वयाच्या मुलीसोबत सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नराधमांनी आधी चाकूचा धाक दाखवून या मुलीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. इतक्यावर हे नराधम थांबले नाहीत तर अत्याचार केल्यानंतर त्या नराधमांनी तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीने सर्व घटना आपल्या आईला सांगितली त्यानंतर चतू:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. जय राजू तिंबोळे, ओम राजू तिंबोळे, किरण जावळे, शुभम जाधव, सुनील जाधव आणि अनिल जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जुलै ते डिसेंबर 2022 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला होता.
आरोपी अनिल जाधव यांनी चाकूचा धाक दाखवून पीडित मुलीचे अपहरण केले. त्यानंतर एका लॉजवर तिला घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींनी वेळोवेळी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले होते. चतू:शृंगी पोलीस ठाण्यात सर्व आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















