जळगाव : प्रतिनिधी
रक्तदान म्हणजे जीवनदान. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बंध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले होते. पर्यायाने शस्त्रक्रियांसह अनेक उपचारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२७ मार्च) रोजी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक व इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कर्ष बँक शाखा जळगाव येथे सामाजिक आपुलकी जपत शहरात नव्याने सुरू झालेल्या उत्कर्ष स्मॉल फायनन्स बँक(जनरल) शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळवणे हे अतिशय जिकरीचे काम आहे. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी खऱ्या दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान अर्पण करू शकतो. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहे.कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘उत्कर्ष बँक’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला. यात सक्रिय सहभाग नोंदवून ही लोकचळवळ उभी राहावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. यावेळी उत्कर्ष बँकेचे शाखा व्यवस्थापक(जनरल बँक) इम्रान रझवी, शाखा व्यवस्थापक(मायक्रो बँक) नित्यानंद राऊत माधव भोसले शुभम भोईवार, उमेश बोन्द्रे, दिपक जोशी, मयुरी राणे, पल्लवी बारी, प्रशांत शिंगणे, सागर उभाळे, शुभम पाचळे, विक्की खेडकर, वैभव लक्केवार, सुनील ब्राह्मणे, अंकुश कडू, मयूर सवाईकर, मनोज राठोड, बंडू कारंडे, सुजित मुगोना इ. कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
