
जळगाव मिरर । २० ऑक्टोबर २०२२
जळगाव शहरातील शिवाजी नगर उड्डाण पुलाजवळ एका इसमाच्या खिश्यातून १५ हजार रुपये चोरी केल्या प्रकरणी ४ अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजी नगर उड्डाणपूल उतरल्यावर कानळदा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कुठल्याही प्रकारची लाईट नसल्याने या अंधाराचा फायदा घेत ४ अनोळखी तरुणांनी लाकूड पेठेतील रहिवासी प्रशांत अशोक पाटील (२८) यास दि १८ रोजी रात्री घरी जात असतांना यांच्या खिश्यातून १५ हजार रुपये काढून पळ काढला. यावेळी त्यांच्या जवळील १५ हजार रुपयाची रोख रक्कम चोरी झाली आहे. या प्रकरणी प्रशांत पाटील यांनी शहर पोलीस स्थानकात धाव घेत ४ अनोळखी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ हे करीत आहेत.




















