
जळगाव मिरर / २० ऑक्टोबर २०२२
भुसावळ येथील पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून गरीब व होतकरू नागरीकांना दिवाळीचा फराळ तसेच कपडे मिळावे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मिळून त्यांचे घरातील चांगले कपडे व दिवाळीचे फराळ एकत्रित केले, साधारण पाचशे ते सातशे कपडे व 35 ते 40 किलो दिवाळीसाठी लागणारे फराळ हे गेल्या तीन दिवसात ताप्ती पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जमा करून गुरुवारी गंगापूरी येथे गरीब वस्तीत होतकरू लोकांना व लहान मुलांना व महिलांना कपडे साड्या दिवाळीचे फराळ वाटप केले. त्यानंतर भुसावळातील राहूल नगर जवळील वस्तीत उरलेले कपडे व फराळ गरीब नागरिकांना व लहान मुलांना देण्यात आले.
यावेळी ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर सोबत त्यांचे शिक्षक गोपाल जोनवाल,अर्जुन सणस,विजय संकत,निलेश फंड (संस्थापक अध्यक्ष – भुसावळचे रक्तदाते) ,डॅनिअल पवार, रचना महाजन, सोनिया टेकवानी,शेफाली श्रीवास्तव आदी उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर म्हणाल्या की आमची शाळा गेल्या कित्येक वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे व आमच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना असले उपक्रम राबवण्यासाठी आनंद वाटतो, जेणेकरून गरीब वस्तीपर्यंत घरोघरी दिवाळीचा फराळ गेला पाहिजे असं ध्येय आमच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आहे असं त्या म्हणाल्या. दिवाळीच्या वेळेस गरीब जनतेपर्यंत व नागरिकांपर्यंत फराळ व कपडे पोहोचवण्याचे हा उपक्रम फक्त ताप्ती पब्लिक स्कूलचे विद्यार्थ्यां करत आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांनी हा आगळावेगळा उपक्रम केल्याने शहरात एकच चर्चा आहे.




















