
जळगाव मिरर / २२ ऑक्टोबर २०२२
शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आर.के.ग्रुपतर्फे यंदा दिवाळीच्या या सणानिमित जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेले व गरजूना दिवाळीची मदत केली आहे.
यंदाच्या दिवाळीत आर.के.ग्रुपने शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या नागरिकांना दिवाळीचा फराळ वाटप करीत त्यांच्या दिवाळीत सहभागी होऊन सामाजिक भान जोपासले आहे. यात राज कोळी, योगेश पाटील, निलेश बाविस्कर, नितीन जाधव,. गोपाळ महाले, दीपक महाले, भूषण सपकाळे, दीपक कोळी, गणेश थोरात, सागर पाटील, करणं पवार यांच्यासह आदी उपस्थित होते.




















