यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय तरूणीला दोन युवकांनी दुचाकीवर पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय ही तरुणी आपल्या आई व बहिणीसोबत रहायला आहे. आई मोलमजूरी करून मुलींचा सांभाळ करत आहे. सोमवारी २८ मार्च रोजी आई ह्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोन्ही मुली घरीच होत्या. सकाळी १० वाजेच्या सुमारास तरूणीला गावातील अरविंद भील आणि प्रकाश भील यांनी दुचाकीवर बसून पळवून नेले. तरूणीला दोघांनी बसवून नेल्याचे तरूणीच्या मामांनी पाहिले व तत्काळ आपल्या बहिणीला हा प्रकार सांगितला. तरूणीच्या आईने शोधाशोध केली यात दोन्ही मुले व मुलगी देखील रात्री उशीरापर्यंत घरी आलेली नसल्याने याप्रकरणी तरुणीच्या आईने यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
