
दिवाळी सुरु असतांना राजकीय दिवाळीहि सुरु झालेली असून आता नवनवीन प्रतिक्रिया या राजकारणातून येण्याची सुरुवात देखील झाली आहे. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. अशा शब्दात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमा केली आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना सुषमा अंधारे यांनी अनेक दिग्गज नेत्यांची उपमा दिवाळी फराळाशी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. तर उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत, असं अंधारे म्हणाले.
शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली. तर राजकारणातले रॉकेट शंकरपाळे गुलाब जामून यासह अन्य फराळाचे पदार्थ आणि फटाके यांची तुलना अनेक राजकारण्यांशी सुषमा अंधारे यांनी केली.तसेच, यावेळी त्यांनी राजकीय फटकेबाजीदेखील केली आहे. तर राजकारणातले रॉकेट शंकरपाळे गुलाब जामून यासह अन्य फराळाचे पदार्थ आणि फटाके यांची तुलना अनेक राजकारण्यांशी सुषमा अंधारे यांनी केली. राजकारणात नारायण राणे हे फटाक्यातल्या दिशाहीन रॉकेट सारखे असून उद्धव ठाकरे हे बॉम्ब असल्याचं त्या म्हणाल्या.फटाक्याची लढ म्हणजे शिवसैनिक असून तुडतुड करणाऱ्या छोटे फटाके म्हणजे नारायण राणेंची दोन मुलं असल्याचं म्हणत त्यांनी फटाक्यातल्या झाडाची उपमा दिली. तर शिवसेना सोडून गेलेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कावळा ब्रँडच्या फटाक्यांची उपमा सुषमा अंधारे यांनी दिली.




















