जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२६
शहरात वेगवेगळ्या घटनेत दोन प्रौढांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पहिल्या घटनेत विनोद वासुदेव कापुरे (वय ४७, रा. सदाशिव नगर) यांनी तर दुसऱ्या घटनेत पितांबर हरि नाथ (वय ४५, रा. नशिराबाद, ता. जळगाव) यांनी आत्महत्या केली. या दोन्ही घटना दि. १० ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी शनिपेठ व नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत विनोद वासुदेव कापुरे (वय ४७, रा. सदाशिव नगर) यांनी मागील खोलीत जाऊन गळफास घेतला. काही वेळानंतर हा प्रकार घरातील सदस्यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत नशिराबाद येथील पितांबर हरि नाथ (वय ४५, रा. नशिराबाद, ता. जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार घरातील सदस्यांच्या लक्षात आला त्या वेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.


















