जळगाव मिरर | विशेष
गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले अवैध वाळू उत्खनन पुन्हा आता जोरदार सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ॲक्शन मोडवर येण्याची गरज निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्याला लागून गिरणा नदी पात्र आहे या नदीपात्रातून दिवस रात्र अवैध पद्धतीने वाळू उपसा होत असतो हा वाळू उपसा अवैध असल्याने ही वाळू अनेक ठिकाणी पोहोच करावी लागत असते त्यामुळे मोठ्या वाहनाच्या मदतीने वाहतूक करावी लागते. महामार्गावर ज्यावेळेस वाहन भरदा वेगाने जाते त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांना देखील चिरडले जाते याचे अनेक उदाहरण समोर आले आहे त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांनी ॲक्शन मोडवर येण्याची गरज आहे.
जळगाव शहरात सहा पोलीस स्थानक आहे या सहा पोलीस स्थानकाच्या हद्दीतून अनेक मोठ्या गाड्या वाळू वाहतूक करीत असतात त्या बदल्यात वसुली होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यामध्ये कथित पोलीस कर्मचाऱ्यांची लिस्ट देखील समोर आली आहे. यात अवैध वाढू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे दर देखील फिक्स करण्यात आले आहे.
मोठे वाहन (१० टायर) – १५०००/-
लहान वाहन (६ टायर) – १००००/-
ट्रॅक्टर – ८०००/-
या पद्धतीने प्रत्येक पोलीस स्थानकातून कथित कर्मचारी हे पैसे वसूल करत असल्याची चर्चा देखील जळगाव शहरात सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या अवैध वाळू चोरीकडे लक्ष देण्याची मागणी देखील होत आहे.
पुढील भागात पोलीस स्थानकाच्या नावासह किती व्यक्ती वसुलीसाठी नेमलेले आहे याची सविस्तर माहिती …


















