
जळगाव मिरर / २५ ऑक्टोबर २०२२
भुसावळचे रक्तदाते टीम व मध्य रेल्वे भारत स्काऊट गाईड च्या माध्यमातून दि.२४/१०/२०२२ रोजी गरीब लोकांना वस्त्र दान व फराळ वाटप करण्यात आले. जिल्हा शिबिर मैदान (DGC) मध्ये सर्व वस्तू एकत्रित करण्यात आले त्यानंतर लाल चर्च ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान ,रेल्वे परिसर ,भिलवाडी इ. ठिकाणी गरीब लोकांना वस्त्र व फराळ वाटप करण्यात आले.
भुसावळचे रक्तदाते सदस्य श्री.निलेश फंड यांनी हा कार्यक्रम पाहिल्यांदा घेतला यात त्यांना भारत स्काऊट गाईड चे सदस्य यांनी मोलाची मदत केली
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भुसावळचे रक्तदाते संस्थापक अध्यक्ष श्री निलेश फंड , श्री अनिल कुमार तिवारी ,श्री शेख सलीम , श्री, मुकेश शर्मा तनिष भोसले , कोमल परदेशी , राजश्री नेवे व स्काऊट गाईड टीम आणि रक्तदाते टीम यांची मोलाची साथ भेटली




















