• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

काय सांगता ! मयत तरून तिरडीवर उठून बसला…पोलिसांनी केला पर्दाफाश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 27, 2022
in क्राईम, राज्य
0
काय सांगता ! मयत तरून तिरडीवर उठून बसला…पोलिसांनी केला पर्दाफाश
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २७ ऑक्टोबर २०२२

देशात अजूनही अंधश्रद्धा प्रत्येक गावात शिल्लक आहे, याचाच एक वाईट बातमी सध्या राज्यभर पसरु लागल्याने पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश करीत पोलीस चौकशी सुरु केली आहे. घटना अशी कि, अकोला जिल्ह्यातील एक मृत युवकाला जिवंत करुन गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून माडला आहे. बुधवारी सायंकाळी एका युवकाचा अंत्यसंस्कार होत असतानाच तो तिरडीवर उठून बसला होता. मात्र, हा केवळ भोंदूगिरीचा प्रकार असल्याचे आता निष्पन्न झाले आहे.

पातूर तालुक्यातील विवरा गावात ही घटना घडली. मृत झाल्याचा बनाव करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस स्टेशनमध्येच त्याची आरोग्य तपासणी केली असता युवक निरोगी आढळून आला आहे. आता हा प्रकार युवकाच्या कुटुंबीयांनी का केला? याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी एका वृतसंस्थेला दिली आहे.

विवरा येथील होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांत मेसरे याला दातखिळी येण्याचा आजार आहे. उपचारासाठी त्याला कुटुंबीयांनी खामगाव येथील डॉक्टरांकडे नेले होते. प्राथमिक तपासणी व उपचारानंतर डॉक्टरांनी काही चाचणी करण्यास सांगितले. त्यानंतर युवकाला अकोला येथे उपचारासाठी नेत असल्याचे सोबतींनी सांगितले. मात्र, त्याला अकोला येथे उपचारासाठी न नेता गावात आणण्यात आले.
बुधवारी सायंकाळी गावामध्ये प्रशांत मृत झाल्याची माहिती पसरली. गावातील सर्व नागरिकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. तेथे नातेवाईक अंतिम संस्काराची तयारी करत होते. प्रशांतला तिरडीवर ठेवण्यात आले. अंत्ययात्रा पाचशे मीटर अंतरावर गेली असता प्रशांतच्या आईने मुलाला गावातील मांत्रिक दीपक गणेश बोरले यांच्याकडे घेऊन नेण्याचे सांगितले. तेव्हा अंत्ययात्रा अंतिम संस्कारासाठी न नेता महाराजांकडे वळवली. महाराजांच्या मंत्र उपचारानंतर काही कालावधीतच तिरडीवरील मयत प्रशांत मेसरे उठून बसला. यावेळी अंतिम संस्काराला आलेले नातेवाईक आणि गावकरी चकीत झाले. पोलिसांनी सर्व घटनाक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, युवकाला त्याच्या आई-वडिलांनी दवाखान्यात न नेता सैलानीकडे नेले. त्यापूर्वी त्याच्या दवाखान्यात रक्तदाब व इतर वैद्यकीय चाचण्या केल्या. त्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्या. त्यानंतर बुधवारी सांयकाळी युवकाला घरी आणले. त्यानंतर त्याच्या अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली. तातडीने त्याला घरुन हलवले आणि लगेच तिरडी पाचशे मीटर जात नाही तोच त्याच्या आईने महाराजांकडे घेऊन चला, असा आग्रह धरला. हा सगळाच प्रकार बनावट असल्याचे प्रथम दर्शनी आढळून येते, असे पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी वृतसंस्थेला सांगितले. त्याबरोबरच गावचे माजी उपसरपंच अमर पजई, सरपंच माणिक देठे, हरीभाऊ इंगोले यांनाही प्रकाराबाबत संशय व्यक्त केला आहे. चानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, पीएसआय गणेश महाजन, पोलीस पाटील भुजंगराव देशमुख आदींनी पीडित मुलगा प्रशांत याला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची आरोग्य तपासणी केली. तपासणीमध्ये तो निरोगी असल्याचे आढळले. मात्र, त्याला मानसिक उपचाराची आवश्यकता आहे काय? याची चौकशी पोलिस करीत आहे. यासर्व प्रकारामुळे विवरा गाव राज्याच्या पटलावर चर्चेत आले आहे. या सर्व मंडळींनी हा सर्व प्रकार केला तरी कशासाठी? याचा तपास पोलिस तपास करत आहे.

Related Posts

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group