
जळगाव मिरर । १९ नोव्हेबर २०२२
शेतातून घराकडे जाणाऱ्या बैलगाडीस मागून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यात बैलगाडीवरील दोन जण तर दोन्ही बैल जखमी झाल्याची घटना १६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गांधली गावाजवळ घडली असून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधली ता. अमळनेर येथील रहिवासी योगेश अंकुश चौधरी यांची बैलजोडी घेऊन मदन पावरा आणि राहुल धनराज पावरा हे १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेतातून घरी जात असताना गांधली अमळनेर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ मागाहून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात दोघांनाही दुखापत झाली तर एका बैलाला पायाला तर दुसऱ्याच्या शिंगाला दुखापत झाली. योगेश अंकुश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार पुरुषोत्तम पाटील करीत आहेत. या घटनेत बैलगाडीवर असलेले दोन्ही जणदेखील जखमी झाले आहेत.




















