जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२६
अतिरेक्यांना तुमच्या बँक खात्यातून पैसे गेले असून तुम्हाला डिजीटल अरेस्ट करण्यात येत आहे. तुम्हाला अरेस्ट व्हायचे नसेल तर विजयसिंग रामकृष्ण पवार (वय ७२, रा. जयकिसान सोसायटी पाचोरा) या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून ५ लाख २० हजारांची रोकड ट्रान्सफर करीत फसवणुक केली. ही घटना दि. २८ सप्टेंबर ते दि. ५ ऑक्टोंबदर दरम्यान घडली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील जयकिसान सोसायटी येथे राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी विजयसिंग पवार यांना दि. २६ सप्टेंबर रोजी अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. समोरील व्यक्तीने कुलाबा पोलीस स्टेशन येथून बोलत असून तुम्ही स्त्रियांना अश्लिल मॅसेज पाठविल्याची तक्रार झालेली आहे. त्यानंतर थोड्याचवेळात दुसऱ्या क्रमांकावरुन पुन्हा कॉल आला. त्याने नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनला तुमच्याविरुद्ध तक्रार झाली असून तुम्हाला डिजीटल अरेस्ट करीत असल्याचे सांगत कॉल कट केला. तिसऱ्या क्रमांकावरुन विजयसिंग पवार यांना व्हिडीओ कॉल आला. पोलीसाच्या वेशात असलेल्यांनी पवार यांचे अतिरेकी सोबत संबंध असून तुमच्या बँक खात्यातून अनेक अतिरेकींना पैसे गेले आहे. तुम्हाला डीजीटल अरेस्ट करण्यात येत आहे. अरेस्ट व्हायचे नसेल तर आम्हाला तात्काळ ५ लाख २० हजार रुपये पाठवा असे म्हणत त्यांच्या व्हॉट्सअॅपवर बँक डिटेल्स पाठविली.
आपल्याला पोलीस डिजीटल अरेस्ट करणार याला घाबरुन विजयसिंग पवार यांनी त्यांच्या बँक खात्यातून समोरील व्यक्तीच्या खात्यावर ५ लाख २० हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर पवार यांनी तिघांना वेळोवेळी कॉल केले परंतू त्यांचे मोबाईल बंद येत असल्याने त्यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार दि. १२ ऑक्टोंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















