जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२६
शाळा सुटल्यानंतर खासगी वाहनाने कंडारी येथे घरी परतत असताना ते वाहन उलटून जखमी झालेल्यांमधील अर्जुन उर्फ प्रदीप प्रल्हाद कोळी (वय १६, रा. कंडारी, ता. जळगाव) या विद्यार्थ्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि.१३ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील उमाळा येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर कंडारी येथे खासगी वाहनाने घरी जात होते. त्या वेळी वाहन उलटून ९ विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. या जखमींमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकरणा विद्यार्थी अर्जुन कोळी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला गोदावरी महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असतांना मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















