
जळगाव मिरर । १९ नोव्हेबर २०२२
शहरातील एका परिसरातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी परिसरातून एका नगरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची घटना दि १८ रोजी घडली आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी निलेश गोसावी हे करीत आहेत.




















