
अमळनेर : विक्की जाधव
तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात गुरुवर्य प्रा. प्रकाश धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या निमिताने दि.१८ रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील होते. जानवी पाटील नूतन पाटील या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले. शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील व शिक्षकवृंद यांनी प्रा. धर्माधिकारी यांचा सन्मान शाल, श्रीफळ व बुके देऊन केला. यावेळी पांडुरंग पाटील, दिनेश पाटील, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी आपले मनोगतात बोलून दाखवले प्रा धर्माधिकारी यांच्या बाबतीतील गत काळातील आठवणी सांगितल्या. हे सांगताना विल्यम शेक्सपियर यांनी लिहलेली नाटके हॅम्लेट व मँकबेथ या नाटकांचे दाखले दिले. पशुपक्षी सारख्या मुक्या प्राण्यांच्या बाबतीत मानवाची सकारात्मक वागणूक हवी असेही सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिलिंद पाटील यांनी केले तर दीपक पवार यांनी आभार मानले. शाळेतील विद्यार्थिनी जयश्री चिंतामण पाटील हिचा वाढदिवस होता व इयत्ता ८ वी तील भाग्यश्री धनगर हिने सूंदर गीत सादर केले. शाळेच्या परिसरात प्रा. धर्माधिकारी व विद्यार्थीनी जयश्री पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना मिलिंद पाटील यांनी केली




















