
जळगाव मिरर । २३ नोव्हेबर २०२२
शहरातील शिवाजी उड्डाण पुलावर एका ट्रक चालकाच्या क्लीनरच्या रोकडची जबरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगर उड्डाण पूल येथे दि २१ रोजी रात्रीच्या सुमारास तीन अनोळखी इसमानी दुचाकीवर येत ट्रकच्या क्लीनरला बिडीची मागणी केली असता त्यावरून वाद घालत शिवाजी नगरातील रहिवासी सचिन राजेद्र अहिरे(वय ३७) या तरुणाच्या खिश्यात हात घालत १७ हजार रोख व १२ हजार ८०० रुपये किमतीचे दोन मोबाईल काढून पळ काढला, या प्रकरणी अहिरे यांनी शहर पोलिसात धाव घेत तीन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.उमेश भांडारकर हे करीत आहेत.




















