
जळगाव मिरर । २४ नोव्हेबर २०२२
शहरातील एका परीसातील शाळेतील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा एमआयडीसी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि २३ रोजी शाळेत गेल्यानंतर ती घरी परत न आल्याने कुणी तरी अनोळखी व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी अनिस शेख हे करीत आहेत.




















