जळगाव मिरर / २५ नोव्हेंबर २०२२
मुंबई येथील २६/११/२००८ च्या भ्याड हल्ल्यात अतिरेक्यांशी लढतांना शहिद झालेल्या हुतात्म्यांचे पुण्यस्मरण व श्रद्धांजली वाहण्यासाठी भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन व रेड प्लस ब्लड बँक, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी काव्यरत्नवली चौक जलगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर सुरु राहणार आहे. यासह वीर हुतात्म्यांना सायंकाळी ६ वाजता काव्यरत्नवली चौक येथे आदरांजली वाहण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन वीर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावे असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.