
जळगाव मिरर / २५ नोव्हेंबर २०२२
पाचोरा तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका तरूणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या एक वर्षापासून शाळेत व क्लासेसला जात असतांना वारंवार पाठलाग करीत दि.24 रोजी दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या भावाला जीवेठार मारण्याची धमकी देत मुलीस दुचाकीवर बसण्याचे सांगून तिला घरी घेवून जात तिला प्रेमपत्र देत त्या चिठ्ठीत मी तुझ्यावर प्रेम करतो असा मजकूर लिहून दिला त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रविण गरुड(वय 19) याच्या विरोधात पाचोरा पोलिस स्थानकात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे हे करीत आहेत.




















