
अमळनेर : प्रतिनिधी
पारोळा येथील परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे दिनांक २२ मंगळवार रोजी निवृत्त जीआरपीएफ सब इन्स्पेक्टर छोटूलाल मधुकर शिंदे यांनी आपल्या मातोश्री कै. हिराबाई मधुकर शिंदे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या आईची आठवण कायमस्वरूपी राहावी. यासाठी दातृत्व म्हणून व विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम मूल्य (3,80,000/ अक्षरी रु.तीन लाख ऐंशी हजार रुपये ) करून दिले. व त्या हॉलचे भव्यदिव्य असा लोकार्पण सोहळा त्यांच्या नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत मिष्ठांन्न भोजन देऊन साजरा केला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पारोळा येथील नायब तहसीलदार श्री बी.आर. शिंदे साहेब तसेच पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामदास वाकोडे साहेब तसेच बापू महाजन नगरसेवक पारोळा, पी.जी पाटील नगरसेवक पारोळा,संजय महाजन सामाजिक कार्यकर्ते, गोविंदराव पाटील नि.मुख्याध्यापक ,रघुनाथ शिंदे नि. शिक्षक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा सो श्री योगेश रघुनाथ महाजन सर आणि शिंदे साहेबांचे नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शाळेची माहिती शाळेचे मुख्याध्यापक मनीष जाधव यांनी दिली व सूत्रसंचालन प्रताप पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश सोनवणे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले.




















