
जळगाव मिरर । २७ नोव्हेबर २०२२
२७ रविवार रोजी आमच्या के जी गुजराथी मुक बधीर निवासी विद्यालय धरणगाव येथे नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव तर्फे हिवाळ्यात थंडीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वेटर परिधान करून स्वेटर रुपी मायेची ऊब मिळाल्याचा आनंद अनुभवला.
याप्रसंगी नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव अध्यक्ष सौ.मनिषा पाटील व सचिव श्रीमती ज्योती राणे यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.संस्थेच्या पदाधिकारी माधुरी शिंपी, किमया पाटील,भारती कापडणे,मरियम बुगडवाला आदींनी विद्यार्थ्यांशी मायेनं हितगुज केलं.
शाळेचे मुख्याध्यापक श्री वाल्मिक पाटील सरांनी आलेल्या संस्थेच्या सर्व पदाधिकारी अतिथींचे स्वागत सत्कार केला.सुत्रसंचलन श्री संतोष भडांगे सर व आभार श्री आर एच पाटील सरांनी मानले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील सर, रामकृष्ण पाटील सर, नंदकुमार पाटील सर, दिपक जाधव , संतोष भडांगे सर, किशोर पाटील सर, चंद्रराव पाटील सर , अनंत जाधव, दिलीप पाटील, उमेश पाटील, कल्पना ठाकरे व विद्यार्थी उपस्थित होते.




















