जळगाव मिरर / २८ नोव्हेंबर २०२२
यावल तालुक्यातील कोरपावली विरावली रस्त्यावर झालेल्या कारने पायदळ जाणाऱ्या व्यक्तिला धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात पादचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेली माहीती अशी की, कोरपावली येथील रहिवासी फिरोज लतीफ तडवी (वय ४८) हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे दिनांक २८ नॉव्हेबर रोजी कोरपावली ते विरावली मार्गावरील रस्त्यावर दुपारी १२ वाजेच्या सुमारास हे कोरपावली गावातुन अॅपे रिक्शाने कोरपावली विरावली गावादरम्यान एका शेतात आपल्या कामानिमित्त जाण्यासाठी येत होते. दरम्यान रिक्षातून उतरून शेतात जात असतांना यावलकडुन मोहराळा कडे जाणाऱ्या वॅगेनआर कंपनीची एमएच १९डी व्ही७२२९या कारने अचानक धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात फिरोज तडवी यांच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांना तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. मात्र तडवी यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव येथे घेवुन जात असतांना भुसावळ जवळ वाटेतच फिरोज तडवी यांचे निधन झाले.