
जळगाव मिरर / ४ जानेवारी २०२३
राज्यभरासह जिल्ह्यातही काँग्रेसतर्फे २६ जानेवारीपासून ‘हात से हात’ जोडो अभियान सुरू करण्यात येणार असून दोन महिने हे अभियान सुरू राहणार आहे. या दरम्यान प्रत्येक गावात रॅली, घराघरांशी संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांचेसोबत महानगर अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, सरचिटणीस जमील शेख उपस्थित होते.
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने भारत जोडो यात्रेचा ‘हात से हात जोडो अभियान’ हा विस्तारित कार्यक्रम दिला आहे. या अभियानाचा शुभारंभ देशाच्या प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२३ रोजी करून गावपातळीवर व प्रत्येक मतदान केंद्रावर दोन महिने सुरु ठेवण्याबाबत कळविले आहे. हे अभियान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी मान्यता दिल्यानुसार व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदिप पवार यांच्या सुचनेनुसार तालुकानिहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.तरी, सर्व तालुकाध्याक्षांनी आपल्या तालुक्यासाठी नियुक्त केलेल्या निरीक्षक व समन्वयकासोबत त्वरित संपर्क साधून ‘हात से हात जोडो अभियान’ आपल्या तालुक्यात यशस्वी करण्याबाबत पुढील योग्य ते नियोजन करावे.
२६ जानेवारी पासून सुरु होणार्या हात से हात जोडो अभियाना करिता पदयात्रेचे नियोजन करावे. हे अभियान तब्बल दोन महिने सुरु राहील याची तयारी करावी. दोन महिन्याच्या पदयात्रेच्या तारखा आणि मार्ग निश्चित करावे.
सर्व ब्लॉक अध्यक्षांनी गाव पातळीवरील निरीक्षकांच्या नियुत्तäया करून ती जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सादर करावी. प्रत्येक गावात व शहरी भागातील वार्डमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकावून यात्रेची सुरवात करावी. तसेच प्रमुख ठिकाणी सभा आयोजित करावी, यात्रा प्रत्येक गावातून गेली पाहिजे याची दक्षता घ्यावी, तसेच राष्टीय नेते राहुल गांधी यांच्या संदेशाची व मोदी सरकारच्या नाकर्तेपणाची पत्रके घराघरात पोहोचवावी, प्रत्येक घराच्या दारावर ‘भारत जोडो यात्रेचे’ स्टिकर लावण्यात यावे, गावागावात सोशल मीडियाचे ग्रुप तयार करावे, युवक काँग्रेसने व एनएसयुआयने तालुका, ब्लॉक व वार्डामध्ये बाईक रॅली काढावी. असा उपक्रम या अभियानात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी यावेळी सांगितले. सर्व समाज घटकांना सोबत घेण्याचा उद्देश यामागे असल्याचे सांगून याआधी भारत जोडो अभियान हे यशस्वी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




















