जळगाव मिरर / २४ मार्च २०२३ ।
अमळनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा बाहेर आल्याने पोलीस प्रशासन या वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी सज्ज दिसू लागले आहे. मारवाड पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध वाळू माफियाचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले आहे.
मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील भरवस गाव ते भरवस पोलीस चौकीपर्यत बेटावदच्या रोडवर अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर दि २३ मार्च २०२३ रोजी आढळून आले. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर सोनालिका कंपनीचे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे तर ५० हजार रुपये किमतीची ट्रोली व ट्रॅक्टरमध्ये अवैध वाळू सुमारे ३ हजार ५०० रुपये किमतीची मारवाड पोलिसांनी जप्त केली आहे. मारवाड पोलिसात पोका.उज्वल युवराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी गिरीश पाटील (वय २५) याच्या विरोधात वाळू चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सचिन निकम हे करीत आहेत.
