• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तंदुरी बाबा कोण ? गरमा-गरम तव्यावर बसून भक्तांना देतोय शिव्यांचा प्रसाद !

आश्रमात पोलीस पोहचताच बाबा गायब

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2023
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
तंदुरी बाबा कोण ? गरमा-गरम तव्यावर बसून भक्तांना देतोय शिव्यांचा प्रसाद !
Share on FacebookShare on Twitter

प्रत्येकाच्या घरात अनेक कार्यक्रम होत असतात अशा वेळी आलेल्या पाहुण्यांना जेवण बनवीत असतो यावेळी चुलीवर मोठा तवा ठेवत त्यावर पोळी शेकली जाते, त्याच गरम तव्यावर एक बाबा बसून भक्तांना आशीर्वाद देतो. आशीर्वाद काय अस्सल वऱ्हाडी भाषेत अतिशय घाणेरड्या शिव्यांची लाखोली वाहतो. एक भक्त चुलीखाली पेटलेली लाकडं टाकण्यात मग्न तर काही जण ‘त्या’ बाबाच्या शिव्यांना प्रसाद म्हणून ग्रहण करतात.

आपल्या खास अंदाजात पांढरं धोतर खांद्यावर पांढरा दुपट्टा ओढून विडी ओढणाऱ्या या बाबाचा ३० सेकंदाचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. मात्र तो कुठला, याचा सुगावा नेटकऱ्यांना लागत नव्हता. अखेर बाबा सापडला. तिवसा तालुक्यातील मार्डी कारला मार्गावर त्याने तथाकथित आश्रम थाटले आहे. सच्चिदानंद गुरुदास बाबा, असे त्याचे नाव.
वेगवेगळ्या ग्रुपवर नेटकऱ्यांनी तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल केला. शिवरात्रीपासून या बाबाची चर्चा सुरू होती. लग्न सोहळ्यात किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात पोळ्या करण्यासाठी पेटविण्यात आलेल्या चुलीवरील तव्यावर बसलेला हा बाबा ‘चूल पेटवा मला झोपायचे आहे’ असा संवाद उपस्थितांशी साधताना दिसतो. मधातच भक्त लोटांगण घालतात तर चप्पल घालून जवळ आलेल्या भक्ताला शिवीगाळ करून बाबा हाकलून लावतात. त्यामुळे हा तंदुरी बाबा कोण, याची अनेकांना उत्सुकता होती. व्हिडीओची दखल अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने घेतली असून शनिवारी पोलिसांचे पथक या बाबाच्या आश्रमात धडकले. झपाट्याने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे अंधश्रद्धा पसरण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी स्वत: पुढाकार घेत बाबाची चौकशी सुरू केली आहे. सच्चिदानंद गुरुदास बाबाने केलेले दावे किती खरे, हेही पडताळून पाहिले जाणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख तपन कोल्हे यांनी सांगितले. आश्रमात पथक पोहोचले तेव्हा बाबा बाहेर गावी गेले असल्याचे सांगण्यात आले.

१०८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्णता माणूस सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही पेटविलेल्या चुलीच्या तव्यावर बाबाने बसून दाखवावे. यात त्यांना कोणतीही इजा होता कामा नये. झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी या बाबाची राहील, असे खुले आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. कधी कधी माझ्यात दैवी शक्तीचा संचार होतो. त्यावेळी मला भान राहत नाही आणि मी गरम तव्यावर बसतो. मला स्वत:लाही कळत नाही. अंधश्रद्धा पसरविण्याचे कोणतेही कृत्य माझ्याकडून होत नसल्याची प्रतिक्रिया सच्चिदानंद गुरुदास बाबाने माध्यमांकडे व्यक्त केली आहे.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group