• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

सावधान : कमी वेळ झोपल्याने होऊ शकतात हे आजार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2023
in आरोग्य, तंत्रज्ञान, देश-विदेश
0
सावधान : कमी वेळ झोपल्याने होऊ शकतात हे आजार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २९ मार्च २०२३

प्रत्येक व्यक्ती दिवसभर काम करून आल्यावर रात्री निवांत झोपत असतो पण सध्या सोशल मीडियाच्या दुनियेमुळे प्रत्येकाची वेळ किमान ११ वाजेची झालेली आहे. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजाराशी सामना करावा लागतो आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. रात्री पुरेशी झोप घेतली नाही तर शरीर अनेक आजारांचे घर बनते. याआधीच्या अनेक संशोधनांमध्ये असे म्हटले आहे की रात्री पुरेशी झोप न घेतल्याने तणाव आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

आता एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, रात्री 5 तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या बंद होतात. इतकंच नव्हे तर यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.  मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की 5 तासांपेक्षा कमी झोपेमुळे पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) चा धोका 74 टक्क्यांनी वाढतो. PAD ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह कमी होतो. रक्तवाहिन्यांद्वारे रक्त मेंदूपासून पायांपर्यंत पोहोचवले जाते.  अभ्यासानुसार, कमी झोपेमुळे संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होऊ शकतात. सात तासांची झोप पीएडीची जोखीम कमी करू शकते ग्लोबल डायबिटीज कम्युनिटीच्या वेबसाइटनुसार, अभ्यासात असे म्हटले आहे की याचे पहिले कारण म्हणजे फॅटी प्लेक, म्हणजे चरबीपासून बनलेली चिकट घाण धमन्यांमध्ये जमा होऊ लागते. याला वैद्यकीय भाषेत ॲथेरोस्क्लेरोसिस असे म्हणतात. संशोधकांनी सांगितले की, कमी झोपेमुळे होणाऱ्या कोरोनरी आर्टरी डिसीजबद्दल आम्हाला आधीच माहिती होती, पण झोपेच्या कमतरतेमुळे पीएडीच्या आजाराबाबत पहिल्यांदाच माहिती मिळाली आहे.

स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या प्रमुख संशोधकांनी सांगितले की, आमच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की दररोज सात ते आठ तासांची झोप ही पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करते. संशोधनात असे आढळून आले आहे की रात्रीची कमी झोप एकतर PAD चा धोका वाढवते किंवा PAD मुळे झोप कमी होते. या अभ्यासात असे म्हटले आहे की जगातील सुमारे 20 कोटी लोक PAD आजाराने ग्रस्त आहेत.

लाइफस्टाइलमध्ये बदल गरजेचा

या अभ्यासात 6.50 लाख लोकांचा समावेश होता आणि त्यांना दोन भागांत विभागण्यात आले होते. पहिल्या भागात, संशोधकांनी अभ्यासातील सहभागींमध्ये दिवसाच्या झोपेचे प्रमाण आणि रात्रीच्या झोपेची एकूण वेळ लक्षात घेतली. त्याच वेळी, कोणत्या लोकांना PAD चा धोका होता, हे देखील लक्षात आले. दुस-या भागात जेनेटिक डेटाद्वारे या आजाराची लिंक शोधण्यात आली. कमी झोपेमुळे पीएडीचा धोका अनेक पटींनी वाढतो याचा भक्कम पुरावा अभ्यासात आढळून आला. मात्र या विषयावर अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्ये, कमी झोपेमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक कसे जमा होऊ लागतात हे शोधणे आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल करून झोप वाढवता येते. विशेषतः शारीरिक हालचालींद्वारे, PAD चा धोका देखील कमी केला जाऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले.

Tags: #helth

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर
जळगाव

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

December 13, 2025
९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम
जळगाव

९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम

December 13, 2025
आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !
जळगाव

आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !

December 11, 2025
जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!
क्राईम

जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!

November 25, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group