जळगाव मिरर / ३ एप्रिल २०२३ ।
देशाला हादरविणारी बातमी समोर आली आहे. एका रेल्वेमध्ये प्रवास करीत असलेल्या दोन महिलेसोबत वाद झाल्यानंतर त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना केरळच्या कोझिकोडमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना केरळच्या कोझिकोड अलप्पुझा-कन्नूर मेन एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या D1 डब्यात रात्री 10 वाजता घडली. या घटनेत आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी झालेल्या पाच जणांना कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, इतर तीन जखमी लोकांना कोझिकोडच्या बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
Kerala | An unidentified man poured petrol on a passenger & set fire inside a moving train near Elathoor in Kozhikode district. 8 people were admitted to a hospital. The incident took place in the D1 compartment of Alappuzha-Kannur Main Executive Express around 10 pm. Further…
— ANI (@ANI) April 2, 2023
दरम्यान, ही घटना इलाथूर पुलावर ट्रेन असताना घडली. अलप्पुझाहून कन्नूरला जाणारी एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेस कोझिकोड सेंट्रल स्टेशनवरून निघाली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. काही वादानंतर आरोपीने महिलेवर पेट्रोल शिंपडल्याचे ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितले. ट्रेनमध्ये असलेल्या लोकांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आठ जण जखमी झाले तर बाकीचे इतर डब्यात पळून गेले. तर आरोपीने ट्रेनमधून उडी मारून पलायन केले. आरपीएफ आणि कोझिकोड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.