
जळगाव मिरर / ६ एप्रिल २०२३ ।

गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील महसूलसह पोलीस खात्याला लाचखोरीचे ग्रहण लागले आहे हे ग्रहण काढण्यासाठी जळगाव लाचलुचपत विभागाचे अधिकारी नेहमीच कटिबद्ध होत काम करीत आहे. आज पुन्हा एकदा महसूलच्या तलाठ्यासह कोतवालाने शुल्लक कारणाने चार हजाराची लाच घेतल्याने महसूल विभागात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, रावेर तालुक्यातील खिरोदा येथील तक्रारदार रहिवाशी आहे. त्याच्या वडीलोपार्जीत शेती ही दोन्ही भावांच्या नावावर आहे. दरम्यान, तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झाल्याने त्याच्या नावावर असलेली शेती भावाची पत्नी व मुलगा यांनी वारस लावण्याची नोंद करण्याच्या मोबदल्यात तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे (वय-४५) रा. गणेश कॉलनी, फैजपुर ता.यावल जि.जळगाव आणि कोतवाल शांताराम यादव कोळी (वय-५२) रा. रावेर यांनी चार हजाराची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला तक्रार दिली.त्यानुसार विभागाने गुरूवार ६ एप्रिलरोजी दुपारी सापळा रचून पंचांसमक्ष तलाठी प्रमोद न्यायदे यांनी कोतवाल शांताराम कोळी यांच्या समोर ४ हजाराची लाच स्विकारली. लाच स्विकारताच जळगाव लाचलुचपत विभागाने दोघांना रंगेहात पकडले. याप्रकरण सावदा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक एस.के. बच्छाव, पो.ना. ईश्वर धनगर, पोकॉ राकेश दुसाने, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, मपोहेकॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर याच्यासह आदींनी कारवाई केली.




















