जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३
जळगाव येथील मूळजी जेठा वरिष्ठ महाविद्यालय, कला शाखेत तृतीय वर्षाला शिकत असणारी राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक चंचल संगीता सुनिल धांडे हिची उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, युनिसेफ महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या युवा संसदेसाठी खासदार म्हणून निवड झालेली आहे.

पाच लाख विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातून ७५ युवा खासदार निवडले गेले. ज्यात चंचल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यात विरोधी पक्ष नेता म्हणूनही चंचलने अर्ज दाखल केलेला आहे. येत्या १८ व १९ एप्रिल रोजी संसदेचे कामकाज होणार असून विधान सभेला मुंबई येथे सुद्धा भेट देण्यात येणार आहे. चंचलच्या या यशासाठी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. एस. एन. भारंबे, विद्यापीठाचे रा. से. यो. संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलावरसिंग वसावे, सह कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल देशमुख सर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. नम्रता महाजन यांनी अभिनंदन केले.




















